गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 21 जानेवारी 2019 (16:32 IST)

तो बाळसाहेब यांचा फेमस डायलॉग ठाकरे चित्रपटातून काढला

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' चित्रपटातील 'हटाव लुंगी बाजाओ -- ' शब्दांवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतलाय. शब्दांमुळे सध्य स्थितीत पुन्हा दक्षिण भारतीय नाराज होतील. त्यामुळे निर्मात्यांनी या शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरले आहेत. चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकू नये, यासाठी निर्मात्यांनी ही भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी दाक्षिणात्यांविरोधात एक जोरदार मोठे आंदोलन  हाती घेतलं होतं. त्यावेळी 'हटाव लुंगी, बजाव पुंगी' अशी घोषणा शिवसेनेकडून दिली होती. आंदोलनाचं चित्रण ठाकरे चित्रपटात आहे. मात्र ‘हटाव लुंगी’ या घोषणेवर सेन्सॉर बोर्डानं आक्षेप घेतला. यामुळे दक्षिण भारतीयांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असं सेन्सॉर बोर्डानं स्पष्ट केले. त्यामुळे ठाकरे चित्रपटातून 'हटाव लुंगी' शब्द काढून त्याऐवजी 'उठाव लुंगी' असे शब्द वापरण्याची तयारी निर्मात्यांनी दर्शवली आहे. ठाकरे चित्रपट 25 जानेवारीला  प्रदर्शित होणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अभिजीत पानसेंनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.