testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सायना नेहवालच्या घरी पोहोचली श्रद्धा कपूर

shradha and saina
हैद्राबाद| Last Modified शनिवार, 16 सप्टेंबर 2017 (15:28 IST)
अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्यावर आधारित बायोपिकमध्ये सायनाची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या भूमिकेसाठी श्रद्धा प्रचंड मेहनत घेत असून, श्रद्धा सायनाच्या हैदराबाद येथील घरी पोहचली आहे. तिने सायनाबरोबरच तिच्या आई-वडिलांचीही भेट घेतली आहे. यावेळी श्रद्धाने सायनाच्या फॅमिलीसोबत लंच केले, तसेच सायनाचा घरातील वावर कसा असतो, याविषयीची माहिती ही श्रद्धाने जाणून घेतली.
श्रद्धाचा आगामी ‘हसीना पारकर’ हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे. सध्या श्रद्धा चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर ती सायनाच्या बायोपिकसाठी बॅडमिंटनही शिकत आहे. सध्या श्रद्धा प्रचंड व्यस्त असलेली अभिनेत्री आहे. कारण प्रोजेक्टबरोबरच तिच्याकडे ‘बाहुबली’ प्रभास
याचा ‘साहो’ हा बिग बजेट प्रोजेक्टही आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला ती लवकरच सुरुवात करणार असून, चित्रपटात ती प्रभासची अभिनेत्री म्हणून काम करणार आहे.


यावर अधिक वाचा :

देवदत्त नागे सत्यमेव जयते मध्ये खलनायक साकारणार

national news
जय मल्हार या मालिकेत खंडोबाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे बॉलिवूडमध्ये ...

मित्राचा फुकटचा सल्ला

national news
रमेश... मानसोपचार तज्ज्ञाकडे रोज रात्री झोपताना वाटणाऱ्या भिती बद्दल इलाज करायला ...

सैफ अली खान बनणार नागा साधू

national news
सैफ अली खानची नवीन वेब सिरीज 'द सॅक्रीड गेम्स' सध्या वेगवेगळ्या कारणामुंळे चर्चेत आहे. या ...

'धडक'चा क्लायमॅक्स जान्हवीकडून लीक ?

national news
अभिनेत्री जान्हवीला 'धडक'च्या क्लायमॅक्सबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं याची कल्पना ...

नवरा-बायकोचं भांडण

national news
नवरा-बायकोचं भांडण होतं. बायको - (रागाने) ते माझे आवडते तीन शब्द म्हण. नवरा - आय लव्ह ...