बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (11:36 IST)

शाहरुखची मुलगी सुहाना खानने अभिनयाच्या विश्वात पाऊल टाकला, पहिला लघुपट प्रदर्शित झाला

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानची ऍक्टींग डेब्यू काही काळेपासून चर्चेत होती. आणि आता सुहानाने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला आहे. तिचे पहिले शॉर्ट चित्रपट 'द ग्रे ग्रे पार्ट ऑफ ब्लू' प्रदर्शित झाले आहे.
 
सुहाना खानची ही शॉर्टफिल्मने धमाल केला आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये सुहाना खानच्या अभिनय कौशल्यांचेही कौतुक केले जात आहे. सुहाना खानच्या पहिल्या चित्रपटाचा व्हिडिओही इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल होत आहे.
 
10 मिनिटांच्या या लघुपटातील सुहानाचा अभिनय, हावभाव, डायलॉग डिलिवरी पाहिलं तर तिने बॉलीवूडसाठी स्वत:ला पूर्णपणे तयार केल्याचं स्पष्ट होत आहे. सुहाना खानच्या पहिल्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे.
 
लहानपणापासूनच सुहाना खानला तिच्या वडिलांप्रमाणेच अभिनय कारकीर्दीत नाव कमावायचे आहे. याचा खुलासा स्वतः तिचे वडील शाहरुख खान यांनी एका मुलाखतीत केला आहे. सुहाना खानने यावर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. पण तिचा पुढील अभ्यास पूर्ण करण्यासाठी ती आजकाल न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. सुहाना खान देखील तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलमुळे बरीच चर्चेत आहे.