रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

करीना कपूर का गेली नाही शशि कपूरच्या प्रार्थना सभेत?

शशि कपूर यांचे 4 डिसेंबर रोजी निधन झाले. पूर्ण बॉलीवूड आणि एवढंच नव्हे तर पाकिस्तानात देखील लोक आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली दिली. 8 डिसेंबर रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईच्या पृथ्वी थिएटरमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन केले होते, ज्यात त्यांचा संपूर्ण परिवार आणि बॉलीवूडचे लोक सामील होते. 
 
परिवाराशिवाय इंडस्ट्रीहून राणी मुखर्जी, रेखा, डिंपल कपाड़िया, आशा भोसले, हेमा मालिनी, जितेंद्र, गुलजार, रजा मुराद सारखे बरेच लोक सामील झाले, पण करीना कपूर उपस्थित नव्हती.  
 
करीना आपल्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त होती. तिनी आपले चित्रपट वीरे दी वेडिंगची शूटिंग पूर्ण केली आहे, पण अजूनही एका गाण्याचे शूट बाकी आहे. त्याशिवाय बर्‍याच जाहिरातींची शूटिंग व्हायची आहे. म्हणून करीना प्रार्थना सभा अटेंड नाही करू शकली.  
 
तसे तर शशि कपूरच्या निधनाची बातमी कळल्यानंतर करीना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान लगेचच पोहोचले होते. त्याशिवाय  प्रार्थना सभेत सैफ अली खानची बहिणी सोहा अली खान आणि तिचा नवरा कुणाल खेमु देखील सामील झाले होते.