शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (17:17 IST)

दक्षिण अभिनेता चियान विक्रमला हृदयविकाराचा झटका, चेन्नईत रुग्णालयात दाखल

दक्षिण भारतीय सुपरस्टार चियान विक्रमला हृदयविकाराचा झटका आला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ते आज संध्याकाळी पोनीयिन सेल्वन चित्रपटाच्या टीझर लॉन्च कार्यक्रमात सहभागी होणार होते.

56 वर्षीय विक्रम यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टर त्यांची काळजी घेत असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याचे म्हणणे आहे. विक्रमला हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे आणि ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.त्यांच्या पोन्नियिन सेल्वन पार्ट 1 या चित्रपटाचा टीझर शुक्रवारी म्हणजेच 8 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता लॉन्च होणार आहे, ज्यामध्ये ते सहभागी होणार होते.विक्रमने तेलुगू, तामिळसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2004 मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. याशिवाय त्यांनी 7 वेळा अभिनयासाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला आहे.