मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

प्रभासच्या सुरक्षेत वाढ

‘बाहुबली २’ला मिळालेल्या यशानंतर प्रभासच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली. प्रभासला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची झुंबड उडते.

चाहत्यांना कळते की प्रभास जवळपास आहे तेव्हा ते त्याचे नावाने जोर जोरात ओरडू लागतात. त्यामुळेच साहोच्या सेटवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतच त्याच्या खासगी सुरक्षेतही दुपट्टीने वाढ करण्यात आली आहे. ‘साहो’ सिनेमाच्या निर्मात्यांना त्याचा सिनेमातील लूक लीक होऊ नये असे वाटते. म्हणूनच त्यांनी त्याच्या खासगी सुरक्षेतही वाढ केली आहे.

प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. या सायन्स फिक्शन सिनेमात प्रभाससोबत श्रद्धा कपूरही दिसणार आहे.