मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘राझी’चा ट्रेलर प्रदर्शित

trailer of aalia bhats
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘राझी’चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २ मिनिटे आणि २१ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये आलिया एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसत आहे. 
 
यात आलियाची भूमिका एका कश्मिरी मुलीची असणार आहे. देशाच्या सुरक्षेसाठी या मुलीचं लग्न पाकिस्तानात करून देण्यात येतं. तिथे राहून ही तरुणी हिंदुस्थानासाठी गुप्तहेराचं काम करते. त्याच आव्हानांची आणि शौर्याची गोष्ट म्हणजे ‘राझी’. या चित्रपटाची कथा हरिंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटात आलियासोबतच अभिनेता विक्की कौशल हा स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच विक्कीसोबतच आलिया भट्टची आई सोनी राजदान आणि मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर देखील या चित्रपटात दिसणार आहेत. ११ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.