उरीचा तमिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये रिमेक येणार
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' ने १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. आता या चित्रपटाचा रिमेक करण्यात येणार आहे. या हिट चित्रपटाचा रिमेक तमिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये येणार आहे. उरी चे निर्माता रोनी स्क्रूवाला आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला दक्षिणेतील अनेक निर्मात्यांचे फोन आले. त्यांनी या चित्रपटाचा रिमेक बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे उरीचे राईट्स विकण्यात आले आहेत.
'उरी' या चित्रपटात विकी कौशलची मुख्य भूमिका आहेत. त्याचबराबेर, यामी गौतम, मोहित रैना, परेश रावल, कीर्ति कुलहरि या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अभिनेता विकी कौशलचा हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात मोटा चित्रपट ठरला आहे.