शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (13:30 IST)

‘भूल भुलैया 2’मध्ये पुन्हा मंजुलिकाच्या भूमिकेत विद्या बालन?

“भूल भुलैया’ बॉलिवुडमधील सर्वाधिक हिट चित्रपटांपैकी एक आहे. आता या चित्रपटाचा सीक्‍वल साकारण्यात येत आहे. “भुल भुलैया-2’मध्ये कार्तिक आर्यान मुख्य भूमिका साकारत असून पहिल्या पार्टमध्ये ही भूमिका अक्षय कुमारने साकारली होती. तसेच पहिल्या भागातील विद्या बालनची भूमिका चाहत्यांना सर्वाधिक आवडली होती. तिने अवनिची भूमिका साकारली होती, जी नंतर मंजुलिकेच्या भूमिकेत समोर येते.
 
आता “भुल भुलैया-2’चे दिग्दर्शन अनीस बज्मी करत आहे. यात कार्तिकच्या ऑपोजिट कियारा आडवाणीला कास्ट करण्यत आले आहे. याबाबत एका मुलाखतीत बज्मी म्हणाले, “भुल भुलैया’मधील दोन सुपरहिट गाणे “आमी जे तोमर’ आणि टायटल सॉन्गचे दुस-या भागात रीक्रिएट करण्यात येणार आहे.
 
दरम्यान, “आमी जे तोमार’ या गाण्याबाब बज्मी यांना विचारले असता ते म्हणाले, या गाण्यात कार्तिक-कियारा असून शकतात किंवा हे गाणे त्या भूमिकेवरही साकारले जावू शकते जी विद्या बालनने साकारली होती. हे एक सस्पेंस असून त्याचा खुलासा लवकरच होईल, असे बज्मी यांनी सांगितले.