मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

झरीन खानच्या कारचा अपघात, बाइकस्वाराचा मृत्यू, अभिनेत्री जखमी

बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानच्या कारच्या गोव्यात अपघात झाला. तिच्या कार आणि बाइकमध्ये जोरदार धडक बसली. या अपघातात बाइकस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना गोव्याच्या मापूसा परिसरात 12 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली.
 
झरीन गोव्यात सुट्टी साजरी करण्यासाठी आली होती. संध्याकाळी ती आपल्या कारमध्ये निघाली. या दरम्यान समोरून येणार्‍या बाइक आणि कारमध्ये मोठा अपघात झाला. या घटनेत नितेश गोरल (30) चा मृत्यू झाला. 
 
दोन्ही गाड्यांची स्पीड जास्त होती आणि नितेशने हेल्मेट घातलेले नव्हते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 
 
या घटनेत झरीन खान जखमी झाली असून तिला पणजी स्थिती रुग्णालयात भरत करण्यात आले आहे.