शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Updated : गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (14:23 IST)

दुनिया दामू देवबाग्याची

इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक डॉ. यशवंत रायकर यांना जाऊन आज एक वर्ष झालं. पुरातत्त्व संशोधक, व्यासंगी वाचक, आणि बुद्धिवादी लेखक म्हणून त्यांचं योगदान हे मोलाचं आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अथातो धर्मजिज्ञासा या पुस्तकाची निर्मिती केली. Anokhi Publications तर्फे हे पुस्तक जानेवारी 2015मध्ये प्रकाशित झालं. पुस्तकसागरच्या वेबसाइट तसेच मोबाइल अॅपवरही हे पुस्तक उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या निर्मितीनंतर डॉ. रायकरांनी दुनिया दामू देवबाग्याची या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या संपादनाला हात घातला. पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा मी हयात नसेन असं ते म्हणायचे. आज त्यांच्या निधनानंतर बरोबर एक वर्षाने त्यांचं हे पुस्तक प्रकाशित होत आहे. आज पुस्तकसागरतर्फे डॉ. रायकर यांना आदरांजली वाहताना अनोखी पब्लिकेशन्सतर्फे दुनिया दामू देवबाग्याची, कहाणी एका शूद्राची हे पुस्तक नव्याने संपादित होऊन पुनर्प्रकाशित पुस्तक सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. पुस्तकसागरच्या वेबसाइटवर व मोबाइल अॅपवर हे पुस्तक ई-बुक तसेच प्रिंट ऑन डिमांड या स्वरूपातही उपलब्ध आहे.

दुनिया दामू देवबाग्याची, कहाणी एका शूद्राची ही एक उपरोधिक शैलीत साकारलेली सामाजिक मानसिकतेवरील भाष्य ठरणारी सखोल चिंतनाचा साक्षात्कार घडविणारी शोकगर्भ असून हसविणारी मुर्तिभंजक अशी साहित्यकृती. उपेक्षित सर्वसामान्य नायकाला मध्यवर्ती ठेवून त्याच्या नजरेतून विकसित होत जाणारे हे आत्मचरित्राच्या बाजातून उलगडत जाणारे कथन मराठी साहित्यातील आपले वेगळेपण ठसवते.

दामूची कहाणी ही ब्राह्मणांमधील शूद्राची व्यथा. अण्णांचा आश्रित असल्यामुळे सेवाधर्म हाच दामूचा धर्म होय असे जोशी संस्थानचे लाभार्थी धरून चालतात. तो देवबागला राहायला राजी झाला असता तर सोन्याहून पिवळे होणार होते. दामूला काम सांगणे, खडसावणे, बोधामृत पाजणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. पगारेकाका शूद्रांमधील सुस्थापित झालेल्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात. नंतर मानसिक गुलामगिरीतून मुक्त झालेला दामू शूद्र राहिला नाही तरी देव मात्र होणार नाही; दैत्यच राहील. उंची गाठूनही लोकप्रियतेचा धनी होणार नाही. कारण त्याचा मार्गच आगळा आहे. पण त्याला कोणताही देव पाताळात गाडू शकणार नाही हेच त्याचे यश असेल. देव व दैत्य यांच्यातील संघर्ष युगानुयुगे चालू आहे. त्याचे एक छोटेसे प्रतिबिंब म्हणजे ‘दामू देवबाग्याची कहाणी’.
हे पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिन्कवर जावे...
https://goo.gl/gwUPFi