Corn Chaat: रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चाट घरी सहज बनवा,रेसिपी जाणून घ्या
अनेकदा संध्याकाळी चहासोबत कोणता स्नॅक्स बनवायचा याचा विचार महिला करतात.रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी कॉर्न चाट घरच्या घरी बनवा.क्रिस्पी कॉर्न चाट ही एक अशी डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. चला तर मग जाणून घेऊया कॉर्न चाटची रेसिपी.
साहित्य
2 कप-ताजे किंवा फ्रोजन स्वीट कॉर्न
1/4 कप -कॉर्न फ्लोअर
2 चमचे-तांदूळ पीठ
अर्धा टीस्पून- काळी मिरी पावडर
अर्धा टीस्पून- लाल मिरची पावडर
1 टीस्पून- आमसूल पावडर -
मीठ - चवीनुसार
1 टेबलस्पून-लिंबाचा रस
शुद्ध तेल
कृती
जर तुम्ही फ्रोजन कॉर्न घेतले असेल तर प्रथम बर्फ वितळू द्या.
नंतर एका मोठ्या भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा आणि त्यात कॉर्न घाला.
आता कॉर्नला 5 मिनिटे उकळू द्या, नंतर चाळणीतून वेगळे करा.
यानंतर एका मोठ्या भांड्यात तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोअर, मीठ आणि काळी मिरी पावडर घालून सर्वकाही चांगले मिसळा.
हे कॉर्न योग्यरित्या कोट करून घ्या.
नंतर एका मोठ्या कढईत तेल गरम करून त्यात कोट केलेले कॉर्न मध्यम आचेवर कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळा.
सर्व्हिंग बाऊलमध्ये कुरकुरीत कॉर्न काढा आणि त्यात तिखट, मीठ,आमसूल पाऊडर आणि लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा.
अशा प्रकारे क्रिस्पी कॉर्न चाट तयार आहे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Priya Dixit