1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2019-20
Written By
Last Modified: बुधवार, 6 फेब्रुवारी 2019 (09:58 IST)

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला

The interim budget
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २५ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होत असून ते २ मार्चपर्यंत चालणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचे दिवस केवळ सहाच असतील. अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारीला विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत सादर करणार आहेत.
 
या अधिवेशनामध्ये राज्यातील दुष्काळावर चर्चा होणार आहे. विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयकेही याच अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. विधान परिषदेतही एक प्रलंबित विधेयक मांडले जाईल.