मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (15:03 IST)

Career in M.Phil. Bioinformatics : बायोइन्फॉरमॅटिक्स (जैव सूचनाशास्त्र) मध्ये एम.फिल करून करिअर बनवा, पात्रता, अभ्यासक्रम, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन बायोइन्फॉरमॅटिक्स 2 वर्षाचा पदव्युत्तर संशोधन स्तरावरील अभ्यासक्रम आहे.एम.फिल इन  बायोइन्फॉरमॅटिक्स ही मास्टर्स आणि डॉक्टरेट मधील इंटरमीडिएट पदवी आहे. या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश शैक्षणिक आणि औद्योगिक दोन्ही उद्देशांसाठी बायोइन्फॉरमॅटिक्स संशोधकांचे उच्च दर्जाचे व्यावसायिक तयार करणे आणि बायोमेडिकल उद्योग, फार्मास्युटिकल कंपन्या आणि विभागाशी संबंधित इतर क्षेत्रांच्या मागण्या पूर्ण करणे हा आहे.
 
पात्रता निकष -
*  इच्छुक उमेदवाराकडे बायोइन्फॉरमॅटिक्स(जैव सूचनाशास्त्र) संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा एमफिल असणे आवश्यक आहे. 
*  बायोइन्फॉरमॅटिक्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराला पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 55% गुण असणे आवश्यक आहे
* राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी 5% गुणांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.
* यासोबतच, उमेदवाराला विद्यापीठाकडूनच किंवा UGC-NET सारख्या राष्ट्रीय परीक्षांद्वारे आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये विद्यापीठाच्या दर्जापर्यंत गुण मिळवावे लागतात. 
 
 प्रवेश प्रक्रिया -
कोणत्याही टॉप युनिव्हर्सिटी मध्ये मास्टर ऑफ फिलॉसॉफी इन बायोइन्फॉरमॅटिक्स (जैव सूचनाशास्त्र)अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना प्रवेश परीक्षेला बसणे आवश्यक आहे. 
प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, वैयक्तिक मुलाखत असते आणि जर उमेदवारांनी त्यात चांगले गुण मिळवल्यावरच त्यांना शिष्यवृत्ती देखील मिळू शकते.
 
अर्ज प्रक्रिया -
 * उमेदवारने अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. 
* अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर,अर्ज भरा. 
*  अर्ज भरल्यानंतर, फॉर्ममध्ये काही चूक असल्यास योग्यरित्या तपासा, अन्यथा तो नाकारला जाऊ शकतो. 
*  मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा. 
 * अर्ज सबमिट करा. 
* क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन फॉर्मची फी भरा.. 
 
प्रवेश कसे मिळवायचे - 
*  बायोइन्फॉरमॅटिक्स (जैव सूचनाशास्त्र)मध्ये प्रवेश घेण्यासाठी सर्वोच्च विद्यापीठाचे लक्ष्य ठेवले असेल, तर त्यांच्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे फार महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करावी लागते आणि नोंदणी प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेशपत्र जारी केले जातात. ज्यामध्ये प्रवेश परीक्षेशी संबंधित सर्व माहिती दिली जाते जसे की परीक्षा कधी आणि कुठे होणार आहे, इत्यादी.
 
 बायोइन्फॉरमॅटिक्स  (जैव सूचनाशास्त्र)अभ्यासक्रमात  प्रवेश प्रक्रियाPG प्रवेश परीक्षा, MCC प्रवेश परीक्षा, M.Phil प्रवेश परीक्षा, GATE (अभियांत्रिकीसाठी पदवीधर अभियोग्यता चाचणी)
 सारख्या प्रवेश परीक्षेवर अवलंबून असते. पात्र उमेदवारांची पुढील मुलाखतीच्या आधारे निवड केली जाते.
प्रवेश परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांनी त्याचा निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरूपात जाहीर केला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार महाविद्यालये दिली जातात.
* मुलाखत आणि नावनोंदणी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले जाते 
  विद्यार्थ्यांना एकतर ऑनलाइन (स्काईप, गुगल मीट, झूम) किंवा ऑफलाइन विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बोलावले जाते.
या दरम्यान, इतर सर्व पात्रता निकष तपासले जातात आणि जर विद्यार्थ्यांनी मुलाखतीत चांगली कामगिरी केली तर त्यांना एम.फील  बायोइन्फॉरमॅटिक्स (जैव सूचनाशास्त्र)चा अभ्यास करण्यासाठी प्रवेश दिला जातो.
 
अभ्यासक्रम -
सेमिस्टर-1 सॅम्पलिंग तंत्र, डेटा रिसर्चचे संकलन, पद्धती, तत्त्वे, डेटा संकलनाच्या पद्धती, सेमिनार 1. 
सेमिस्टर - 2 संशोधन पॅरामेट्रिक आणि नॉन-पॅरामेट्रिक चाचणी सांख्यिकी, संशोधन अहवाल, संशोधन पद्धती, तंत्र, सेमिनार 2. 
सेमिस्टर 3 जैविक, डेटाबेस संरचना, अंदाज, आण्विक, डॉकिंग मायक्रो अॅरे, प्रकल्प कार्याचा परिचय. 
सेमिस्टर 4 स्ट्रक्चरल बायोइन्फॉरमॅटिक्स, प्रोटीन स्थिरता आणि फोल्डिंग डेटा मायनिंग, स्ट्रक्चरल बायोइन्फॉरमॅटिक्स, प्रबंध.
 
शीर्ष महाविद्यालये -
प्रेसिडेन्सी कॉलेज 
गौतम  विज्ञान विद्यापीठ 
 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉरमॅटिक्स 
 जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) 
 स्कूल ऑफ लाईफ सायन्स 
 बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स 
 बनारस हिंदू विद्यापीठ 
 छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ
 
 जॉब व्याप्ती आणि पगार -
बायोइंफोर्मेटिक्स सायंटिस्ट - पगार 4 लाख 
प्रोफेसर- पगार 3 लाख 
ज्युनिअर रिसर्च असोसिएट- पगार 4.5 लाख
 डेटाबेस इंजीनियर- पगार 5 लाख 
बायोइंफॉर्मेटिक्स सॉफ्टवेअर इंजीनियर- पगार 5 लाख