1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (13:13 IST)

IBPS लिपिक परीक्षा 2020 : परीक्षेची तयारी करताना या 5 चुका टाळाव्या

IBPS Clerk Exam 2020
IBPS ने लिपिक पदासाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू केल्या आहेत. या वेळी IBPS लिपिकच्या 2557 पदांसाठी भरती होणार आहेत. इच्छुक उमेदवार 23 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबरच्या कालावधीत अर्ज करू शकतात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या वेळी IBPS लिपिक पूर्व परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहेत, तर मेन्स परीक्षा जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहे.
 
IBPS लिपिक परीक्षेत लाखो विद्यार्थी अर्ज करतात. पण थोड्याच विद्यार्थ्यांना या मध्ये यश मिळत. बहुतेक नापास होणारे विद्यार्थी त्यांचा केलेल्या तयारी मुळे मागे पडतात. आज आम्ही आपणास या लेखात अश्याच काही चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या चुकांना हे विद्यार्थी वारंवार करतात. या बरोबर या चुका टाळण्याचे उपाय देखील आपल्याला सांगणार आहोत. 
IBPS लिपिक परीक्षेसाठी विद्यार्थी या 5 चुका करतात. 
 
1 अभ्यासक्रमाला व्यवस्थित समजत नाही - 
अयशस्वी होणारे विद्यार्थी सुरुवाती पासूनच चुका करतात. अभ्यासक्रम किंवा सिलॅबस न समजताच अभ्यासाला सुरुवात करून देतात. या मुळे त्यांना परीक्षेची तयारी व्यवस्थितरीत्या करता येत नाही. नंतर परीक्षेच्या वेळी त्यांना प्रश्न बाहेरचे वाटू लागतात. म्हणून सर्वात जास्त महत्त्वाचे असते की आपण प्रश्नपत्रांना चांगल्या प्रकारे समजून घेणे. 
 
2 बरीच पुस्तके वाचणे -
IBPS लिपिक सारख्या परीक्षेची तयारी करत असलेल्या बहुतेक विद्यार्थ्यांना असे वाटते की आपण जेवढी जास्त पुस्तके वाचू त्यांची तयारी अधिक चांगली होईल. पण याचा उलट ते अधिकच गोंधळून जातात. म्हणून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आपण तयारी करताना कमीत कमी पुस्तकांचा वापर करावे. या साठी आपण न्यूमेरिकल ऍबिलिटी (संख्यात्मक क्षमतेसाठी) NCERT च्या पुस्तकांची मदत घ्यावी. 
तसेच आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम व्यापलेली पुस्तके वाचायला पाहिजे.
 
3 अंदाज लावणे -
बहुतेक विद्यार्थी परीक्षेच्या वेळी या चुका पुन्हा पुन्हा करतात. एकाधिक निवड प्रणालीच्या परीक्षेत दिलेल्या 4 पर्यायांपैकी योग्य उत्तर न मिळाल्यास कोणत्याही पर्यायाला निवडून उत्तरे देतात. अंदाजे उत्तरे दिल्यामुळे त्यांना नकारात्मक गुण मिळतात. IBPS लिपिक परीक्षेत देखील नकारात्मक गुण दिले जातात. या परीक्षेत चुकीचे उत्तर दिल्यावर 0.25 गुण वजा केले जातात. म्हणून जो पर्यंत उत्तरासाठी आपली 100 टक्के खात्री नसेल तो पर्यंत उत्तरे देऊ नये.
 
4 पुनरावृत्ती न करणे - 
बऱ्याचदा असे होते की विध्यार्थी परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात येऊन वाचलेले सर्व काही विसरून जातात. विशेषतः न्यूमेरिकल ऍबिलिटी विभागात सूत्रे विसरणे. याचे मुख्य कारण म्हणजे पुनरावृत्ती किंवा रिव्हिजन न करणे. दररोज वाचलेल्या विषयांचे पुनरावलोकन करावे. या साठी ठराविक विषयांचे नोट्स बनवावे. नोट्स तयार केल्यामुळे आपण वाचलेल्या धड्यांची पुनरावृत्ती (रिव्हिजन) देखील करू शकता. असे केल्याने आपला वेग देखील सुधारेल.
 
5 एकाच वेळी बऱ्याच विषयांचे वाचन करणे - 
सर्व सामान्य प्रथा असते की विद्यार्थी एकाच वेळी बऱ्याच विषयांचे वाचन सुरू करतात. जेव्हा परीक्षेसाठी कमी वेळ असतो. यंदाच्या वेळी IBPS लिपिक परीक्षेत काही असेच आहे. म्हणून आपल्याला एकाच वेळी एकच विषयाचा अभ्यास करावयाचा आहे. एकाच वेळी बरेच विषय वाचल्याने आपल्याला तोटा संभवतो. एक विषय घ्या आणि जो पर्यंत चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास होत नाही तो पर्यंत दुसरे विषय घेऊ नये.
 
याच काही चुकांना लक्षात घेऊन आपण तयारी करत असल्यास आपण चुका करणे टाळू शकता आणि चांगले परिणाम मिळवू शकता.