शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

जॅमालॉजी :रत्नासारखं चमकवा करिअर

WD
WD
जेमॉलॉजी हे असे विज्ञान आहे जे रत्नांच्या वैशिष्टांविषयी व्यापक माहिती देते. याला आपण असेसुद्धा म्हणू शकतो की जेमॉलॉजीअंतर्गत रत्नांचे अध्ययन अणि त्यांना सुंदर बनविण्याचे काम केले जाते. भारतात रत्नांचा बाजार एकूण निर्या‍तीचा पाचवा भाग आहे. या मोठ्या्बाजारामुळे भारताला मोठ्याप्रमाणात विदेशी चलन प्राप्त होते. म्हणून या क्षेत्राशी संबंधीत लोकांना प्रशिक्षण देण्याबरोबर त्यांना तांत्रिक ज्ञानही देणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे समस्त मानव जातीसाठी रत्न/हिरे उत्सुकतेचा विषय राहिले आहे. एक प्रकारे याकडे श्रीमंतीचे लक्षण आणि राजे-राजवाड्यांशी संबं‍धीत म्हणून बघितले जाते. पारंपारिकरित्या रत्नजडीत दागिने तयार करण्याचे काम लोक पिढ्यापिढ्यांपासून तयार करीत आले आहेत. केवळ सोनरच नाही तर त्यांचे कारागिरही हे काम शिकतात आणि शिकविण्याचे काम करतात. परंतु आज त्याच्यासाठी पारिवा‍रीक पाश्वभूमी आवश्यक राहिलेली नाही. या कामासाठी आज मोठ्या संख्येने प्रशिक्षण केंद्रही सुरू झाले आहेत. जे डिझाईन, तयार करणे आणि त्याच्या बनावटीसंबंधी माहिती देण्याचे काम करतात.

फॅशन आणि अ‍ॅसेसरीज च्या वाढत्या मार्केटने जेमॉलॉजीच्या क्षेत्राला मोठा विस्तार मिळाला आहे. आपल्या देशात जयपूर तसेच सुरत येथे सर्वात मोठे रत्न कटींग सेंटर्स आहेत. या ठिकाणी लेटेस्ट डिझाईन आणि ट्रेन्डसचे रत्न तयार केले जातात. भारतीय जेम अ‍ॅन्ड ज्वेलरी इन्डस्ट्री नव्या शताब्दीमध्ये चांगला आत्मविश्वासाने प्रगती करू लागली आहे. भारतात रत्न कटींग करणारे आणि कारागिरांना जगात मोठ्या आदराने बघितले जाते.

जेमॉलॉजिस्टच्या कामात रत्नांची पडताळणी, निवड आणि त्याची योग्य श्रेणी ठरविण्याची जबाबदारीचा समावेश आहे. जेमॉलॉजिस्ट रत्न निर्माते आणि त्याची डिझाईन करणार्‍यांना योग्य मार्गदर्शनही करतात. कोणत्याही व्यक्तीवर रत्नांचा होणारा परिणामाच्या बाबतीत जेमॉलॉजिस्टला चांगल्या प्रकारची माहिती असते. जेमॉलॉजिस्टचे सुक्ष्म अवलोकन करणे, त्याची पडताळणी करणे आणि त्याची शुद्धता तसेच प्रामाणिकपरा सिद्ध करण्याची क्षमता असली पाहिजे. या संबंधी शिक्षण मिळविण्यासाठी अति उच्च तां‍त्रिक माहितीशिवाय कटिंग, छाननी, किंमत आणि ओळण्याची माहिती जेमॉलॉजिस्टला असणे आवश्यक आहे.

कोणत्याही कंपनीमध्ये काम करण्यापूर्वी किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट येण्यापूर्वी तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरू करु शकता. फक्त तुम्हाला मार्केटमध्ये वेळोवेळी होणार्‍या बदलाची माहिती असते आवश्यक आहे. ज्वेलरी डिझायनिंगशिवाय तुम्ही जेम कटिंग, रेखीव दागिने बनविणे, त्यात सुधारणा करणे तसेच रत्नजडित घड्याळी, वस्त्र तसेच अॅसेसरीज तयार करू शकता. या बरोबरच स्वत: डिझाईन तयार करून मोठमोठे ज्वेलर्स किंवा कंपन्यांना डिझाईन करून देण्याच कामही मोठे फायद्याच्या सौद्याचे ठरते.

दाग‍दागिन्यांचा बाजार बराच मोठा आणि स्पर्धात्मक आहे. म्हणून काम सुरू करण्यापूर्वी सेल्सचा अनुभव, मार्केटिंगची माहिती तसेच बिझनेस मॅनेजमेंटचे गुप्त फंडे शिकणे गरजेचे आहे. मेहनती युवकांसाठी हे क्षेत्र मोठे फायदेशीर आहे. आजच्या या ठागबा‍जीच्या जागत सिंथेटिक रत्न मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. त्यामुळे खरे रत्न ओळखण्यासाठी फक्त विश्वासच नाहीतर सायंटिफिक माहिती जॅमॉलॉजिस्टला असणे आवश्यक आहे. जेमॉलॉजी कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कमीतकमी बारावी पास असणे आवश्यक आहे. याबरोबरच अंग्रजीवरवर चांगली पकड असणेही अत्यंत गरजेचे आहे. कारण तुम्हाला देशातच नाहीतर विदेशी ग्राहक आणि कंपन्यांसोबत चागल्याप्रकारे बस्तान बसवायचे असते. जर तुम्हाला घरूनच तुमचे काम सुरू करायचे असेल तर कमीतकमी दोन लाख रुपयाची गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.

भारतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेमॉलॉजी, इस्ट पार्क रोड, करोल बाग नवी दिल्ली, ज्वेलरी डिझाईन अॅन्ड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, ए-89, सेक्टर-2, नोएडा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, गुलमोहर पार्कजवळ, हौसखास, नवी दिल्ली, इंटरनॅशनल जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, निर्मल टॉवर, 10वा मजला, 26 बारखंबा रोड, नवी दिल्ली, तसेच सुरत येथे इंडियन डायमंड इन्स्टिट्यूट, सुमुल डेअरी रोड येथे या संबंधीचे कोर्स चालविले जातात.