गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. चॅम्पियन्स करंडक-09
Written By वार्ता|

आमच्या चुकांमुळे पराभव: धोनी

चॅंपियन्स करंडक स्पर्धेत आम्ही विजयासाठी अधिक प्रयत्न करायला हवे होते. परंतु भारतीय संघ आपल्या चुकांमुळे उपात्यंफेरी गाठू शकला नाही, अशी कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने दिली. वेस्ट विडींजविरुद्धच्या सामान्यात विजय मिळाल्यानंतर धोनी बोलत होता.

चॅंपियन्स करंडक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा 54 धावांनी पराभव केला होता तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. यामुळे विडींजविरुद्धचा एकमेव सामना जिंकून गटात भारत तिसर्‍या क्रमांकावर राहिल्याने उपात्यंफेरी गाठू शकला नाही.

धोनी म्हणाला की, मालिकेत आम्ही खूप चुका केल्या. आमच्या गोलंदाजांना फलंदाजांवर अंकुश ठेवता आले नाही. स्पर्धेदरम्यान आम्हाला अष्टपैलू खेळाडूची उणीव भासली. आम्ही विजयासाठी जास्त प्रयत्न करु शकलो असतो. आता पुढच्या वेळी जेव्हा आम्ही मैदानावर उतरणार तेव्हा आमच्यातल्या त्रूटी दूर झालेल्या असतील.