testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आपल्या मुलांशी संवाद साधताना...

mother
आपण आपल्या मुलांशी संवाद साधत असताना आपल्याही कळत नकळत मुले आपली भाषा, आपले विचार, आपली बोलण्याची पद्धत आत्मसात करीत असतात. त्यामुळे मुलांशी बोलताना किंवा त्यांच्यासोर एखाद्या विषयाची चर्चा करताना आपण काळजी घेणे स्वाभाविक आहे. आपल्या मुलांशी संवाद साधताना आपल्या बोलण्यातून मुलांवर नकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
एखाद्या कारणाने मुलांनी जर तक्रारीचा सूर धरला, किंवा खेळताना मुलांना थोडेसे लागले, तर मुले रडारड करतात. अशावेळी त्यांनी खेळताना काळजी घ्यावी किंवा मुले तुमचे कसे ऐकत नाहीत, याबद्दल मुलांची कानउघडणी करण्याआधी मुलांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीबद्दल त्यांची तक्रार असेल, तर त्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

मुले आपणहून एखादे काम करीत असली आणि त्याध्ये काही उणिवा राहिल्यास त्यासाठी त्यांना नावे ठेवणे आवर्जून टाळायला हवे. कामामध्ये मुले की पडत आहेत असे दिसले तर ते काम पूर्ण करण्यासाठी मुलांना मदत करा. काम व्यवस्थित होण्यासाठी मुलांनी ते कसे करायला हवे याबद्दल मार्गदर्शन करा. प्रत्यक्षपणे मदत करता येणे शक्य नसले तरी तुमच्या मार्गदर्शनामुळे मुलांना त्यांच्या कामामध्ये फायदाच होईल, तसेच कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांना तुमच्याकडून मदत मिळेल असा विश्वास मुलांच्या मनामध्ये निर्माण होईल. तसेच तुमच्या मदतीची मुलांना गरज असेल तर मुले आपणहून तुमच्याकडे येतील ह्याची खात्री बाळगा. त्यांना आवश्यकता नसताना त्यांच्या कामामध्ये अकारण दखल देऊ नका. त्यांचे प्रकल्प, अभ्यास त्यांचे त्यांना करण्यास प्रोत्साहन द्या.
तुम्ही कामामध्ये असताना जर मुले तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असली तर त्यांच्यावर चिडू नका. तुमचे काम संपण्यासाठी किती वेळाची तुम्हाला आवश्यकता आहे, याबद्दल मुलांना कल्पना द्या

आणि त्यानंतर तुम्ही त्याच्याशी बोलाल असे आश्र्वासन त्यांना द्या. जर तुम्ही घराबाहेर कामानिमित्त असाल आणि मुले तुम्हाला वारंवार फोन करीत असतील, तर त्यांना तुमच्या कामाचे स्वरूप समजावून सांगा आणि मोकळा वेळ मिळताच त्याच्याशी संपर्क करण्याचे आश्र्वासन द्या.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

काय आपल्याला माहीत आहे हात धुण्याची योग्य पद्धत

national news
लहानपणापासून स्वच्छ हात धुऊन मग जेवायला बस असे ऐकले आहे. दिवसभर कित्येक वस्तूंना हात लागत ...

फेशियल करताना घेण्यात येणारी काळजी

national news
व्यवस्थित देखरेख नाही केली तर पुरळ (पिंपल) उठू शकतात. नॉर्मल त्वचा असल्यास सॉफ्ट साबणाने ...

१६ ऑक्टोबर वर्ल्ड स्पाइन डे - निरोगी पाठीसाठी आठ सोपे मार्ग

national news
अनारोग्यदायी जीवनशैली, दगदगीची दिनचर्या आणि चुकीची शारीरिक ढब यामुळे पाठीच्या कण्याशी ...

बाहेर जाताना घ्या डोळ्यांकी काळजी

national news
आजकाल ऑफिसमज्ञध्ये वा घरी सरार्स कॉम्प्युटरचा वापर अपरिहार्य असला तरी सलग दोन-तीन तास ...

सफरचंदचे सेवन करा आणि दृष्टीदोष दूर करा

national news
आजारी व्यक्तीला प्रतिदिन एक सफारचंद खायला दिल्याने त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याला ...