1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (09:01 IST)

राज्यात मंगळवारी ३ हजार ६६३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

3 thousand 663
राज्यात मंगळवारी ३ हजार ६६३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख ७१ हजार ३०६ झाली आहे. राज्यात ३७ हजार १२५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ३९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ५१ हजार ५९१वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के एवढा आहे.
 
राज्यात  ३९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३, ठाणे ५, पुणे २, नाशिक २, सोलापूर २,सातारा २, सांगली २, यवतमाळ ४, बुलढाणा ३, नागपूर ७ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३९ मृत्यूंपैकी १७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. २ हजार ७०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १९ लाख ८१ हजार ४०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६६ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख ९६ हजार ४४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ७१ हजार ३०६ (१३.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ८२ हजार ९७० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर १ हजार ७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.