मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 1 जून 2020 (16:17 IST)

प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू

गिरगावातील प्रसिद्ध होमिओपॅथी डॉक्टर आणि दळवी रुग्णालयाचे सेक्रेटरी डॉक्टर शशांक मूळगावकर (५६) यांचं निधन झालं. मूळगावकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. शांत, संयमी आणि कार्यतत्पर, मदतीसाठी कधीही धावून येणारे मूळगावकर हे अनेक बड्या सेलिब्रिटींचेही डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. 
 
होमिओपॅथिमध्ये शिरस्ता असलेले डॉ. मूळगावकर हे बॉलिवूडच्या कपूर कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर होते. अनेक दिग्गज यांच्याकडून उपचार करुन घेत.गेल्या सहा दिवसांपासून ते श्वास आणि हायपरटेंशनने ग्रासले होते. यकृत आणि हृदयाशी संबंधित आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील सामाजिक, सांस्कृतिक कार्यात मूळगावकर हे झोकून देऊन काम करत होते. मूळगावकर यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने 18 मे रोजी बॉम्बे रुग्णालयात दाखल केलं होतं.