सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2020 (16:14 IST)

मनसेकडून ट्विटरवर हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध सूचना देण्यात येत आहे. यामध्ये अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा यासारखे अनेक आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने एक खास व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना आवाहन केले आहे.

मनसेने ट्विटरवर एक हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कोरोनाच्या अमानवी संकटाच्या काळात समाजभान जपा, कोरोना रुग्णांशी सौजन्यानं वागा असं आवाहन केलं आहे. तसेच दोन माणसांमधलं शारिरीक अंतर जरूर राखा पण मनानं दूर जाऊ नका असा संदेश व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सोशल डिस्टन्सिंग'चा भलताच अर्थ घेऊन काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना वा त्यांच्या कुटुंबीयांना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनसेने 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या प्रार्थनेचा आधार घेत लोकांना आवाहन केले आहे.