बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (15:47 IST)

नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोना

राज्यात पुन्हा कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होताना असून ग्रामीण भागात पसरत आहे. त्याचवेळी मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. आता नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राऊत यांनी संपर्कात आलेल्यांना क्वारंटाई व्हावे तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.