दिल्लीच्या निजामुद्दीन येथील ‘त्या’ कार्यक्रमास महाराष्ट्रातीलपुणे येथे 136 जणांची ‘हजेरी’

Nizamuddin, Marktaz K. Ijtima 2
Last Modified बुधवार, 1 एप्रिल 2020 (16:16 IST)
दोन आठवड्यापूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण दिल्लीसह देशातील अनेक राज्यात गेले आहे.तर विशेष म्हणजे या संमेलनात सहभागी झालेल्यांपैकी किमान 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. तर 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन झाले आहे. आणखी 200 जणांमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून आली आहे. त्यातील 121 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तीमुळे
देशात खळबळ उडाली आहे. 21 राज्यातील 10 हजार लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे देशभरात पसरलेल्या या प्रचारकांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. देशात खळबळ उडाली आहे.

दिल्लीत या कार्यक्रमासाठी आलेल्या 250 परदेशी नागरिकांपैकी किमान 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील 136 जण सहभागी झाले होते. त्यातील 30 जण पुण्यातील असून 3 जण पिंपरी आणि 3 जण जिल्ह्यातील आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे शहर व जिल्ह्यात किमान 40 जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हे सर्व जण अजूनही पुढे येत नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यामध्ये अडचणी येत आहे.

त्यांच्यातील 36 जणांना शोधण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 5 जणांना या अगोदरच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

तामिळनाडुतील 50 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील 45 जणांचा दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झाले होते. उत्तर प्रदेशात 156, तामिळनाडुमधील 501, आसाममधील 216, मध्य प्रदेशातील 107, तेलंगणा 55, कर्नाटक 45, झारखंड 46, पश्चिम बंगाल 73, उत्तराखंड 34 अशा विविध राज्यातील प्रचारक आपापल्या राज्यात गेले असून ते आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे त्यांना लागण झाली का व त्यातील काही जणांना लागण झाल्याचे आढळून आल्यास ते आणखी किती जणांच्या संपर्कात आले. त्यांनी तो इतरांमध्ये पसरविला आहे का याची तपासणी करण्याची गरज आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील आरोग्य विभाग आणि पोलिसांना मोठी शोध मोहीम हाती घ्यावी लागली आहे. कोल्हापूरमधील 21 जण या कार्यक्रमात सहभागी झाले असून त्यातील 6 जणांचा शोध घेण्यात येऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार

बिहारमधले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद करणार
मात्र बिहारच्या नितीश सरकारने परराज्यातून येणाऱ्यांसाठी केलेले सर्व क्वारंटाईन सेंटर बंद ...

कोरोना लसीच्या चाचणीसाठी ३० माकडांची आवश्यकता

कोरोना लसीच्या चाचणीसाठी ३० माकडांची आवश्यकता
कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तत्काळ विकसीत ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत ...

आरोग्य विभागाचा विशेष उपक्रम, बिहार सरकारकडून मजुरांना मोफत कंडोमचं वाटप
इतर राज्यांमधून आपल्या घरी परतलेल्या बिहारमधील कामगारांसाठी स्थानिक राज्य सरकारच्या ...

कोरोनामुळे ट्रॅव्हल कंपन्या बंद, 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना ...

कोरोनामुळे ट्रॅव्हल कंपन्या बंद, 'या' कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वात आधी म्हणजेच जानेवारीपासून ट्रॅव्हल कंपन्या बंद ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या ...

जागतिक पर्यावरण दिन: हे संकल्प करूया ज्याने आपल्या पुढल्या पिढ्यांना शुद्ध हवेत श्वास घेता येईल
दर वर्षी 5 जून रोजी विश्व पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने ...