बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (08:31 IST)

दिलासादायक, कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सातत्यानं वाढताना दिसत होते. पण रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचं दिलासादायक चित्र  समोर आलं आहे. सोमवारी राज्यात 5,984 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 15 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 13,84,879 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.48 % एवढे झाले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 
 
राज्यात सोमवारी 125 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 81,85,778 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16,01,365 (19.56 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24,14,577 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 23,285 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 1,73,759 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात 5,984 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16,01,365 झाली आहे.