1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (09:21 IST)

विकासदराने उणे २३.९ टक्के, ऐतिहासिक निचांकी पातळीवर

केंद्र सरकारने सोमवारी विकासदराची आकडेवारी GDP data जाहीर केली. त्यानुसार एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली. ४० वर्षांत पहिल्यांदाच जीडीपीमध्ये इतकी मोठी घसरण झाली आहे.
अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांची तुलना करायची झाल्यास बांधकाम, उत्पादन आणि खाणकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने प्रमुख आठ घटकांच्या Core sector  वृद्वीची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानुसार जून आणि जुलै महिन्यात या क्षेत्रांचा विकासदर अनुक्रमे उणे १२.९९ टक्के आणि उणे ९.६ टक्के इतका राहिला होता. गेल्या वर्षी जुलै २०१९ मध्ये या आठ प्रमुख क्षेत्राचा वृद्धीदर २.६ टक्के होता.