जीएसटीमध्ये मोठी तूट

Last Modified शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (09:44 IST)
लॉकडाउनमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असतानाच जीएसटीतून होणाऱ्या उत्पन्नालाही ओहोटी लागली आहे. मागील वर्षी एप्रिल ते ऑगस्टमध्ये जीएसटीद्वारे ५५ हजार ४४७ कोटी रुपये सरकारला मिळाले होते. यंदा त्यात तब्बल ४१ टक्के तूट असून २७ ऑगस्टपर्यंत गेल्या ५ महिन्यांत जीएसटीमधून सरकारी तिजोरीत ३२ हजार ७०२ कोटी रूपये जमा झाले आहेत.
यंदा राज्याला एक एप्रिल ते २७ ऑगस्टपर्यंत ३२ हजार ७०२ कोटी रूपये महसूल मिळाला आहे. त्यात पेट्रोल व डिझेल १० हजार ५४३ कोटी (व्हॅटमधून), व्यवसाय कर ७६८ कोटी, एसजीएसटी १५ हजार ९२५ कोटी, आयजीएसटी ५ हजार ४६५ कोटी यांचा जीएसटीत समावेश आहे. २०१५-१६ मध्ये राज्यातील जकात बंद केल्यानंतर तितकेच उत्पन्न जीएसटीतून मिळण्याची हमी केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास पाच वर्ष दरवर्षी १४ टक्के वाढ नुकसान भरपाईत देण्याची हमी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या या हमीनुसार राज्याची यावर्षीची २२ हजार ५०० कोटीची जीएसटीची नुकसान भरपाई प्रलंबित आहे. मागच्या वर्षीची ६ हजार ८३६ कोटी थकबाकी यावर्षी मिळाली आहे. २०१५-२०१६ मध्ये पेट्रोल डिझेलवरील व्हॅट वगळता राज्याला ६० हजार कोटी जीएसटीतून मिळाले. त्यावर १४ टक्के वाढीप्रमाणे मागील पाच वर्षांतील म्हणजे पुढील वर्षापर्यंत एक लाख १६ हजार कोटींवर ही थकबाकी जाणार आहे, अशी माहिती जीएसटी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

ममता बॅनर्जी : नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ममता बॅनर्जी ...

ममता बॅनर्जी : नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ममता बॅनर्जी यांना संताप का अनावर झाला?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती कार्यक्रमातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ...

अंजली पाटील:‘मांग के नही मिला को छिन के लेंगें पण गावाचा ...

अंजली पाटील:‘मांग के नही मिला को छिन के लेंगें पण गावाचा विकास करणारच’
"बलात्कार करणाऱ्या मुलांना घरात ठेवतात आईवडील पण आम्हाला ठेवत नाहीत. तृतीयपंथी व्यक्तींचा ...

राहुल द्रविडच्या सल्ल्याची प्रिंटआऊट काढा, स्पिन बॉलिंग ...

राहुल द्रविडच्या सल्ल्याची प्रिंटआऊट काढा, स्पिन बॉलिंग चांगली खेळू शकाल- केव्हिन पीटरसन
स्पिन बॉलिंगचा यशस्वी सामना करायचा असेल तर राहुल द्रविड यांच्या सल्ल्याची प्रिंटआऊट काढा ...

अजित पवार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ...

अजित पवार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी का आले नाहीत?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुंबईतील फोर्ट येथे अनावरण ...

पीएमसी बँक घोटाळा : हितेंद्र ठाकूर यांच्या ग्रुपवर ईडीचे ...

पीएमसी बँक घोटाळा : हितेंद्र ठाकूर यांच्या ग्रुपवर ईडीचे छापे
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष ...