'या' गृहोपयोगी वस्तूंवरील जीएसटी कमी झाला
केशतेल, टूथपेस्ट, साबण यासारख्या गृहोपयोगी वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. या वस्तूंवर पूर्वी २९.३% कर आकारण्यात येत होता. आता तो १८ टक्के करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
मोदी सरकारने आज करदात्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. २८ टक्के करांच्या खाली केवळ लक्झरी वस्तू व नाशवंत वस्तू आहेत. या टॅक्स स्लॅब अंतर्गत २३० वस्तू होत्या, मात्र २०० वस्तू कमी टॅक्स स्लॅबमध्ये हलविण्यात आल्या आहेत.
तसेच ज्या व्यापाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न ४० लाख रुपये आहे त्यांना जीएसटीमधून सवलत देण्यात आली आहे. ही मर्यादा याआधी २० लाख रुपये होती. याशिवाय सरकारने सिनेमा तिकिटावरील टॅक्सही कमी केली आहे. याआधी ३५ % ते ११० % टॅक्स स्लॅबमध्ये असलेले तिकिटांचे दर आता १२ % आणि १८ % वर आले आहे.