शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (15:30 IST)

श्रीगणेश चतुर्थी 2020 : 10 दिवसात गणेशाच्या या 11 उपायांपैकी कोणते ही 1 उपाय करा..

धार्मिक ग्रंथानुसार, गणेश चतुर्थी हा गणेशाचा प्रगटीकरणचा दिवस मानला गेला आहे. या दिवशी भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी उपवास आणि पूजा करतात.
 
ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी काही विशेष उपाय केल्याने भगवान श्री गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. आपल्याला ही या संधीचे सोने करावयाचे असल्यास तर हे उपाय विधी-विधानाने करावे.
 
आपल्याला जे पाहिजे ते मिळेल गणेशाच्या या उपायांपैकी, कोणतेही 1 करावे.
 
1 शास्त्रात भगवान गणेशाचे अभिषेक करण्याचे सांगितलेले आहे. गणेश चतुर्थीला भगवान गणेशाचे अभिषेक केल्याने विशेष फायदे मिळतात. या दिवशी आपण शुद्ध पाण्याने श्री गणेशाचे अभिषेक करावे. त्याच बरोबर श्रीगणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. नंतर खवाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करावा.
 
2 गणेशयंत्र हा एक चमत्कारिक यंत्र आहे याची घरात स्थापना करा. या यंत्राची पूजा आणि स्थापना केल्याने फायदे मिळतात. हे यंत्र घरात असल्याने कोणतीही वाईट शक्ती घरात येत नाही.
 
3 प्रत्येकाच्या जीवनात बऱ्याच समस्या असतात पण त्यांच्यापासून सुटकारा मिळवण्यासाठी आपण गणपतीच्या 10 दिवसात हत्तीला चारा खाऊ घाला आणि गणेशाच्या देऊळात जाऊन आपल्या समस्यांच्या निदान करण्याची विनवणी करा. असे केल्यास आपल्या आयुष्यातील त्रास काहीच दिवसात नाहीसे होतील.
 
4 आपल्याला ऐश्वर्य हवे असल्यास आपण गणेशाला अंघोळ केल्यावर भगवान श्रीगणेशाला साजूक तूप आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. काही वेळानंतर हे गूळ तूप गायीला खायला द्या. हे उपाय 10 दिवस केल्याने पेश्यांशी निगडित सर्व समस्या नाहीश्या होतात.
 
5 गणेश चतुर्थीला सकाळी अंघोळ केल्यावर जवळच्या एखाद्या गणेशाच्या देऊळात जाऊन गणेशाला 21 गुळाच्या गोळ्या बनवून दूर्वांसह अर्पित करावं. हे उपाय केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
 
6 गणेश चतुर्थीला पिवळ्या रंगाची गणेशाची मूर्ती आपल्या घरातच स्थापित करून पूजा करावी. पूजेत 5 हळकुंड श्री गणाधिपतये नमः मंत्र म्हणत अर्पण करावे. या नंतर 108 दूर्वांवर ओली हळद लावून श्री गजवकत्रम नमो नमः च्या मंत्राचा उच्चार करीत अर्पण करा. हे उपाय सलग 10 दिवस करावा. असे केल्यास आपणांस बढतीचे योग येतील. 
 
7 या दिवसात एकाद्या गणेशाच्या देऊळात जाऊन दर्शन केल्यावर आपल्या यथोशक्तीने गरजूंना देणगी द्या. वस्त्र, अन्न, फळे, धान्य काही ही देणगीस्वरूपात देऊ शकता. त्याच बरोबर काही दक्षिणा म्हणजेच पैसे द्यावे. देणगी दिल्याने पुण्य प्राप्त होतो आणि भगवान श्री गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात.
 
8 जर मुलीचे लग्न होत नसल्यास, गणेश चतुर्थी किंवा या दिवसात विवाहाशी निगडित मागणी करून भगवान श्री गणेशाला मालपुवाच नैवेद्य दाखवावा आणि उपवास करावा. लग्नाचे योग त्वरितच जुळून येतील.
 
9 गणेश चतुर्थीला दूर्वांचे(एक प्रकारचे गवत) गणपती बनवून त्यांची पूजा करावी. मोदक, गूळ,फळे, खव्याची मिठाई इत्यादी अर्पण करावी. असे केल्यास गणपती सर्व इच्छा पूर्ण करतात.
 
10 मुलाच्या लग्नात अडथळे येत असल्यास, गणेश चतुर्थीला किंवा या दिवसात श्री गणेशाला पिवळ्या रंगाच्या  मिठाईचा नैवेद्य दाखवावा. असे केल्याने मुलाच्या लग्नाचे योग जुळून येतील.
 
11 गणपतीच्या दिवसात संध्याकाळी घरातच श्रीगणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. तत्पश्चात भगवान श्री गणेशाला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा. ह्याच नैवेद्याने आपले उपवास सोडावे आणि भगवान गणेशाकडे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठीची प्रार्थना करावी.