1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (09:05 IST)

महालक्ष्मी देवी

mahalaxmi devi
आल्या आल्या घरी जेष्ठा कनिष्ठा,
श्रद्धा अपरंपार आहे चरणी निष्ठा,
कल्याण करावयास येती "त्या" माहेरा,
मोहरूंनी जाती, येता आपुल्या घरा,
लावा तोरण दारावर, 
करा सडा समार्जन,
काढा रांगोळी ती दारी, पावले काढून,
घ्यावी साडी चोळी, भरा त्यांची ओटी,
देतील आशिर्वाद त्याही भरल्या पोटी,
लेकरा सोबत राहतील, आनंदभरे
माहेर च्या अगत्याला, कधी न विसरे! 
करा पूजन तुम्ही ही मनोभावे, 
महालक्ष्मीस आणि काय बरें हवे? 
कृपा त्यांची बरसेल, ह्याची आहे शाश्वती, 
सान-थोर सारे तीचे गोडवे घरी गाती, 
तीन दिवस एक सण होऊनिया जातो, 
विसर्जनाचे दिवशी, पदर ओला होतो! 
पुनः यावे आपण, लेकरा सोबत, 
करू स्वागत आपुले, टाळ गजरात
 
अश्विनी थत्ते 
नागपूर