आले वाजत गाजत गणराज घरी
आले वाजत गाजत गणराज घरी,
पुजनाची तुम्ही करावी तयारी,
मनोभावे करा, भालचंद्राचे पूजन,
एकवीस मोदक ठेवा नैवेद्य म्हणून,
जुडी दूर्वांची आवडे एकदंतासी,
फुल जास्वंदचे आवडे लंबोदरासी,
करा आरती, कुटुंबा समावेत,
वाजवुनी टाळ्या जल्लोष करत,
विघ्न हर्ता नेईल सर्व विघ्ने आता,
त्याचीच प्रचिती येईलच हो आता,
करा जयघोष, होऊनी उत्साहित,
विनायकाचे स्मरण, करा तुम्ही सतत!!
......अश्विनी थत्ते.