1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (11:32 IST)

पुजू गं आज हरितालिका

Hartalika aarti
पुजू गं आज हरितालिका,
मिळून आपण सर्व बायका,
काढू गं गौर, तळ्याकाठी,
शंभू महादेवा, पुजण्यासाठी,
वाहू पत्री, अन कापसाचे वस्त्र,
पार्वतीने पूजीली होती वर्ष दहासहस्त्र,
पुण्याचा अनुभव ह्याची जन्मा घेऊ,
सवाष्णींना फळे, वाणही देऊ,
करू या जागरण, खेळू या खेळ,
महापूजे ची ही आहे या वेळ,
नटून थाटून येतीलच आज सर्वजणी,
हरितालिकेची करू या बसून कहाणी,
पावो सर्वांना तो "सांब सदाशिव"
व्रताच पुण्य फळं सर्वांना मिळावं!!
 
....अश्विनी थत्ते.