गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (14:23 IST)

श्री गणेशाने 3 वेळा जन्म घेतला आणि लिहिले महाभारत ...

भगवान गणेशाच्या संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. ज्याप्रमाणे शिव आणि विष्णूंचे अवतार झाले आहेत. त्याच प्रमाणे गणेशाचे देखील अनेक अवतार झाले आहेत, या सर्व कथा गणेशा शी निगडित बघून संभ्रम होतो. प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेणारे गणपती हे आदिदेव आहे. चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या युगात गणेशाने कोणते अवतार घेतले.
 
गणेशाचे 12 प्रमुख नावे आहेत- सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाशक, विनायक, धूम्रकेतु, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन. त्यांचा प्रत्येक नावाच्या मागे एक आख्यायिका आहे.
 
1 सतयुग : श्री गणेश सतयुगात सिंहावर आरूढ होऊन प्रगट झाले होते. असे म्हटले जाते की भगवान श्री गणपतीने कृतयुग म्हणजेच सतयुगात कश्यप आणि अदितीकडे श्री अवतार महोत्कट विनायकाच्या नावाने जन्मले. या अवतारामध्ये गणपतीने देवतान्तक आणि नरान्तक नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माची स्थापना करून आपल्या अवताराला संपविले. या युगात गणेशाचे वाहन सिंह आहे. ते दशबाहू,तेजस्वी आणि सर्वांना वरदान देणारे आहेत.
 
2 त्रेता युग : श्री गणेश त्रेता युगात मोरावर आरूढ होऊन प्रगट झाले. त्रेतायुगात गणपतीने उमाच्या गर्भेतून भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी जन्म घेतला आणि त्यांना गणेश नाव दिले. त्रेतायुगात त्यांचा वाहन मोर आहे, वर्णन पांढरे आहे आणि तिन्ही जगात मयूरेश्वर नावाने ओळखले जाते आणि षष्ठभुजी आहे. या अवतारात गणपतीने सिंधू नावाच्या राक्षसाचे संहार केले आणि ब्रम्हदेवाच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या मुलींशी लग्न केले.
 
3 द्वापर युग : द्वापारयुगात श्री गणेश उंदीरावर बसून प्रगट झाले. द्वापर युगात त्यांचा वर्ण लाल आहे. ते चतुर्भुजी आणि त्यांचे वाहन मूषक आहे आणि गजाननाच्या नावाने प्रख्यात आहे. द्वापारयुगात गणपतीने पुन्हा पार्वतीच्या गर्भेतून जन्म घेतले आणि गणेश म्हणवले. परंतु गणेशाच्या जन्मानंतर काही कारणास्तव पार्वतीने त्यांना अरण्यात सोडले, जिथे पराशर मुनीने त्यांचे संगोपन केले.
 
या अवतारामध्ये गणेशाने सिंदुरासुराचे वध केले आणि त्याने कैद केलेल्या अनेक राजांना आणि वीरांना सोडवले होते. याच अवतारात गणेशाने वरेण्य नावाच्या आपल्या भक्ताला गणेश गीतारूपी शाश्वत तत्त्व ज्ञानाचे उपदेश दिले होते. असेही म्हटले जाते की महिष्मती वरेण्य हे वरेण्यचाच मुलगा असे. कुरूप असल्यामुळे त्यांना अरण्यात सोडण्यात आले होते.
 
असेही म्हटले जाते की या द्वापर युगात ते ऋषी पराशरच्या घरी गजमुखाच्या नावाने जन्मले होते. गजमुख नावाचे राक्षसाचे वध केल्यामुळे उनना हे नाव ठेवले गेले. त्यांचे वाहन उंदीर असे, जे पूर्वजन्मी एक गंधर्व असे. या गंधर्वाने ऋषी सौभरीं यांचा बायकोवर वाईट दृष्टी टाकली होती ज्यामुळे त्याला उंदीरच्या योनीत राहण्याचे श्राप मिळाले होते. या उंदराचे नाव डिंक आहे.
 
पहिले लेखक : गणेशाला पौराणिक पत्रकार किंवा लेखक असे ही म्हणतात. कारण त्यांनीच महाभारत लिहिले होते. या ग्रँथाला रचणारे महर्षी वेदव्यास होते, पण लिखाणाची जबाबदारी गणेशाला दिली होती. याला लिहिण्यासाठी गणेशजींनी एक अट ठेवली होती की त्यांचे लिखाण कुठे ही थांबू नये. या साठी महर्षी वेदव्यासाने त्यांना म्हटले की त्यांनी प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजूनच मग लिहावं. श्लोकाचा अर्थ समजण्यास गणेशाला थोडा वेळ लागत होता आणि त्याच वेळी वेदव्यास आपले महत्त्वाचे काम करायचे.
 
4 कलियुग : असे म्हणतात की गणेश कलिकाल घोड्यावर स्वार होऊन येतील. असे म्हणतात की श्री गणेश कलियुगाच्या शेवटी अवतार घेणार. या युगात त्यांचे नाव धुम्रवर्ण किंवा शूर्पकर्ण असणार. ते देवदत्त नावाच्या निळ्या रंगाच्या घोड्यावर चतुर्भुजी होऊन स्वार होणार आणि त्यांचा हातात खङग असणार. ते आपल्या सैन्यासह पापींचा नाश करतील आणि सत्ययुगाची सुरुवात करतील. या वेळी ते कल्की अवताराचे साथ देतील.