शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (11:34 IST)

हरितालिका तृतीया विशेष : सौभाग्याचा संरक्षणासाठी करावं हरितालिका तृतीया व्रत कैवल्य..

हरितालिका तृतीयेचे व्रत किंवा उपवास निराहार आणि नीरजाला केले जाते. आख्यायिका आहे की या उपवासाला सर्वप्रथम देवी पार्वतीने भगवान शंकर पतीच्या रूपात मिळावे या साठी केले होते. हरितालिका तृतीयेचे व्रत केल्याने सौभाग्याचं लेणं प्राप्त होतो.
 
भाद्रपदाच्या शुक्लपक्षाच्या तृतीयेला हरितालिका व्रत कुमारिका मुली मनवांछित नवरा मिळावा आणि सवाष्ण बायका आपल्या सौभाग्याचा संरक्षणासाठी करतात. हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य मिळतं. या  व्रतामध्ये देवी पार्वती आणि भगवान शंकराची पूजा केली जाते. जेणे करून जीवनात सर्व सुखाची प्राप्ती होवो.
 
हरितालिका तृतीयेचे व्रत एक असे व्रत आहे, ज्याला सवाष्ण बायकाच नव्हे तर कुमारिका मुली आणि विधवा बायका देखील करू शकतात. शास्त्रांत म्हटले आहे की या व्रताला केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते.
 
शुभ मुहूर्त -
हरितालिका तृतीया 21ऑगस्ट -
सकाळी 5 वाजून 54 मिनिटांपासून सकाळी 8:30 पर्यंत.
प्रदोषकाळ हरितालिका पूजेचे मुहूर्त -
संध्याकाळी 6:54 मिनिटांपासून रात्री 9:06 वाजे पर्यंत.
 
तृतीया तिथी प्रारंभ -
21ऑगस्ट,रोजी रात्री 2:13 पासून
 
तृतीया तिथी समाप्त -
पुढच्या दिवशी रात्री 11:02 मिनिटं पर्यंत.
 
पौराणिक महत्त्व -
हरितालिका तृतीया भाद्रपद महिन्याचा शुक्लपक्षाच्या तृतीयेला साजरी करतात. शास्त्रानुसार हरितालिका तृतीया सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण मानली जाते. या व्रताचे वैशिष्ट्ये म्हणजे की ह्याचा उपवास सवाष्ण बायका, कुमारिका मुली, विधवा बायकांच्या व्यतिरिक्त कमी वय असलेल्या मुली देखील करू शकतात. हे व्रत नीरजाला देखील करू शकतात. या व्रतामध्ये गणपती, शिव,पार्वतीची पूजा केली जाते.
 
विधी-विधानाने करावी पूजा -
* हरितालिका तृतीयेमध्ये भगवान श्रीगणेशा, शिव, देवी पार्वतीची पूजा करतात. या साठी पूजा करण्यापूर्वी त्यांचे आव्हान केले जाते. 
* ओली माती किंवा वाळूने ह्यांचा मुरत्या बनवल्या जातात. नंतर गणपतीची पूजा करून त्यांना दूर्वा आणि फुल अर्पण करावे.
* या नंतर भगवान शिवाची पूजा करावी. त्यांना बेलपत्र, शमीपत्र फुले अर्पण करावे. नंतर देवी पार्वतीची सर्व सौभाग्याच्या साहित्यांनी पूजा करावी.
* या नंतर दोघांना वस्त्र,फळ अर्पण करावं. आणि हरितालिकाची कहाणी वाचावी किंवा ऐकावी.
* शेवटी श्री गणपतीची आरती करावी तसेच शंकराची आणि हरितालिके देवीची आरती करावी. नैवेद्य दाखवावा.     
 
या व्रताची सांगता दुसऱ्या दिवशी सकाळी होते. हरितालिका देवीला दही भात कानवाल्याचा नैवेद्य दाखवावा. आणि यथोचित या व्रताची सांगता करून त्यांचे विसर्जन करावे.