सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 30 मार्च 2022 (09:30 IST)

हे 3 घरगुती उपाय करा, कीटकांचा नायनाट करा.......

घराला स्वच्छ ठेवून पण स्वयंपाकघरात, स्नानगृह, शौचालयात किंवा हवेमध्ये न दिसणारे सूक्ष्म किटाणू, विषाणू असतात. बरेच लोक या जागेस सॅनिटाइझ किंवा फिनाईलची फवारणी करून या जागेला निर्जंतुक करतात. जर का आपणास हे रासायनिक उपाय करावयाचे नसतील तर घरात जंतूपासून मुक्त करण्यासाठीचे काही वास्तू आणि आयुर्वेदिक सोपे उपाय केल्याने वास्तु दोषासह घर निर्जंतुक नाशक होते. त्याचे ज्योतिषीय फायदे सुद्दा आहेत.
 
1 मीठाचा वापर - पाण्यात सेंधव मीठ टाकून त्या पाण्याने स्वयंपाकघर, लादी, पुसून घ्यावे. जमेल तर या पाण्यात थोडा लिंबाचा रस आणि कापूर टाकावा. या पाण्याला स्नानघर आणि स्वछतागृहात सुद्धा टाकू शकतात. स्नानगृहात सेंधव मीठ आणि तुरटीने भरलेली वाटी ठेवा. दर महिन्यात त्या वाटीतले मीठ किंवा तुरटी बदलत राहा.  वातावरणातील नकारात्मक उर्जा आद्रतेबरोबर मीठ शोषून घेतं आणि तुरटी निर्जंतुक करते. 
 
2 तुरटीचा वापर - तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म असतात. तुरटीच्या पाण्यात गुळवेलचा रस टाका. त्या पाण्याने घरातील सर्व दारे, खिडक्या, लादी पुसून काढा. घरातील सर्व दारं, खिडक्यांमध्ये तसेच बाल्कनीत सुद्धा तुरटी आणि कापराचे लहान- लहान तुकडे ठेवावे. याने वास्तू दोष होत नाही त्याच बरोबर घर निर्जंतुक होते. 
 
3 धुपाचा धूर - आपल्या हिंदू धर्मात षोडशांग धूपबत्तीच्या धूर देण्याचे महत्व आहे. ह्यात अगर, तगर, चंदन, वेलची, तज, नाखनखी, नागरमोथा, शैलाज, कुष्ठ, मुशीर, जटामांसी, कापूर, सदलन, गुगुळ आंबा, कडुलिंबाची सालं टाकून या धुपाचा धूर दिल्यास हवेतील जंतू नाहीसे होतात. घरात दररोज कापूर जाळायला हवे. 
 
शेणाच्या गवऱ्यावर ह्या सर्व वस्तू टाकून जाळून त्याचा धूर घरात केल्याने घरातील सर्व नकारात्मक उर्जा आणि त्याच बरोबर सर्व जंतूंचा नायनाट होईल. धुपाचा धूर दिल्याने मन, शरीर तसेच घरातील वातावरण पण शांत आणि आल्हाददायक राहते. रोगराही, दुःख नाहीसे होतात. गृहकलह, पितृदोष तसेच घरात होणारे आकस्मिक अपघातांपासून रक्षण होते. घरातील सर्व नकारात्मक उर्जा घराबाहेर जाते. त्याने घरातील वास्तुदोष नाहीसा होतो. त्याच बरोबर ग्रह-नक्षत्रांपासून होणारे दुष्परिणामांपासून धूर दिल्याने रक्षण होते.