1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
  4. Chaitra Navratri 2026 Ghatasthapana Ashtami Navami and Ram Navami dates

चैत्र नवरात्री 2026 घटस्थापना, अष्टमी-नवमी आणि रामनवमी कधी?

चैत्र नवरात्री २०२६ मध्ये रामनवमीच्या तारखेबाबत पंचांगानुसार दोन मते दिसून येत आहे, परंतु उदय तिथी आणि दुपारी १२ वाजता होणारा जन्मोत्सव विचारात घेता बहुतांश ठिकाणी २६ मार्च २०२६ रोजी रामनवमी साजरी केली जाईल. चैत्र नवरात्री २०२६ मध्ये घटस्थापना, अष्टमी, नवमी आणि रामनवमीच्या महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहे.
१. घटस्थापना (पहिला दिवस)
तारीख: १९ मार्च २०२६, गुरुवार.
मुहूर्त: सकाळी ६:५५ ते सकाळी ८:०८ पर्यंत (काही पंचांगानुसार १०:१० पर्यंत).
अभिजीत मुहूर्त: दुपारी १२:०५ ते दुपारी १२:५३ पर्यंत.
 
याच दिवशी महाराष्ट्रात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाचा प्रारंभ होत आहे.
 
२. दुर्गा अष्टमी (महाअष्टमी)
तारीख: २६ मार्च २०२६, गुरुवार.
या दिवशी माता महागौरीची पूजा केली जाते आणि अनेक घरांमध्ये कुलदेवीचा कुळधर्म-कुळाचार (हवन) केला जातो. 
 
३. चैत्र नवरात्र नवमी
तारीख: २७ मार्च २०२६, शुक्रवार.
नवमी पूजा: याच दिवशी देवीच्या नवव्या स्वरूपाची, म्हणजे माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते.
 
थोडक्यात वेळापत्रक:
नवरात्र प्रारंभ (घटस्थापना): १९ मार्च २०२६.
महाअष्टमी: २६ मार्च २०२६.
चैत्रनवमी: २७ मार्च २०२६.
नवरात्र समाप्ती (पारण): २७ मार्च २०२६.
 

महत्वाची टीप- 

सूर्य उदित अष्टमी २६ ला आहे म्हणून  श्री दुर्गा अष्टमी २६ तारखेला साजरी होईल. तसेच श्रीराम जन्मोत्सव पण २६ तारखेला साजरा होईल अष्टमी तिथी ११.४५ वाजता समाप्त होईल व ११.४६ वाजता नवमी लागेल. घरी आणि मंदिरात दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा होईल. व चैत्रनवमी २७ तारखेला असून अनेकांकडे या दिवशी कुळाचार म्हणजेच कुळधर्म करण्यात येईल. 

 
स्थानिक पंचांगानुसार सूर्योदयाच्या वेळेत बदल झाल्यामुळे मुहूर्ताच्या वेळेत काही मिनिटांचा फरक असू शकतो. रामनवमी हा चैत्र नवरात्रीचा नववा दिवस असतो. जर तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करत असाल, तर २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०६ नंतर किंवा सूर्योदयानंतर पारण (उपवास सोडणे) करणे योग्य ठरेल.
पुढील लेख
बुधवारी करा गणपतीची ही खास पूजा; सर्व अडथळे दूर होतील