मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (20:33 IST)

प्रवीण तरडे यांनी चूक केली मान्य

दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांनी गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली देशाचे संविधान ठेवल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर प्रविण तरडे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे यांनी आपल्या हातातून झालेली चूक मान्य केले आहे.
 
प्रवीण तरडे व्हिडिओ शेअर करत म्हणाले की, मी माझ्या घरी या वर्षी पुस्तक बाप्पा अशी संकल्पना केली होती. पण, यावेळी माझ्याकडून चूक झाली. गणरायाच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधान ठेवले होते. कारण, गणराय हा बुद्धीचा आणि कलेचा दैवता आहे. त्यामुळे अशी माझी भावना होती. पण, ती खूप मोठी चूक होती. ही चूक मला अनेकांनी फोन करुन निर्दशनास आणून दिली, असं प्रवीण तरडे यांनी सांगितले. यानंतर मी माझी चूक सुधारली असून पुन्हा अशी चूक होणार नाही, असं प्रवीण तरडे यांनी सांगितले.