मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 22 जुलै 2020 (09:26 IST)

पहिल्यांदाच ओटीटीवर येणार प्लॅनेट मराठी, खास मराठी मनोरंजनासाठी

मराठी भाषेला या ओटीटीवर स्थान मिळताना दिसत नाही. प्लॅनेट मराठी ओटीटी हे भारतातले पहिले मराठी भाषेतील मनोरंजनास प्राधान्य देणार आहे.
 
म मनाचा, म मराठीचा ही याची टॅगलाईन आहे. मराठी कलेला प्राधान्य मिळावे आणि मराठी प्रेक्षकांना आपल्या भाषेतील मनोरंजन एका क्लिकवर उपलब्ध व्हावे हेच प्लॅनेट मराठी ओटीटीचे ध्येय आहे. चित्रपट, नाटकं, सत्य घटनांवर आधारित तसेच काल्पनिक कलाकृती, वेब सिरीज, डॉक्युमेंटरी, या साऱयांची सांगड घालणारा हा एकमेव मराठी ओटीटी असणार आहे. मनोरंजनच नव्हे तर पाककला, व्यायाम, लहान मुलांचे माहितीपर कार्यक्रम हे सारेच या ओटीटीवर उपलब्ध असेल. अँड्रॉइड व आयओएस धारकांसाठी मनोरंजनाची नवी परिभाषा आखणाऱया या ओटीटीने प्रत्येक मराठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी काहीतरी खास प्रयोजन केलेले आहे  . 
 
प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेचे सीएमडी आणि मराठी चित्रपटसफष्टीतले नावाजलेले निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले की, मराठी चित्रपट वितरणाच्या बाबतीत काही प्रमाणात मागे पडत असल्यामुळे आपल्या चित्रपटांच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवरील गणितही मागे पडतात असं चित्र आहे. त्यामुळे वितरणाच्या वेळी खर्च होणारा पैसा हा चित्रपटासाठी वापरला जाऊ शकतो. ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचवला जाऊ शकतो. शिवाय, यातून रोजगाराच्या संधी आणि नव्या टॅलेंटलाही वाव मिळेल आणि मराठीपण जपत हे माध्यम कायम प्रेक्षकांसाठी आणि मराठी कलाकारांसाठी काम करत राहील. 
 
प्लॅनेट मराठी बाबत बोलताना अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणतात, प्लॅनेट मराठी हे बदलत्या काळाबरोबर बदलत्या मराठी मनोरंजनाची नवी परिभाषा लिहत आहे. पुष्कर हे सेलर प्लॅनेट मराठी सर्व्हीसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. संगीत संयोजक आदित्य ओक हे प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेसचे सीओओ आहेत.