सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (15:13 IST)

सिनेकलाकार आणि कोरोनायोद्धांचा 'सुखकर्ता दुःखहर्ता'

सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली आहे, यंदाचा गणेशोत्सव थोडा वेगळा जरी असला तरी, बाप्पाच्या आगमनाची आतुरता प्रत्येकाला आहे. हीच आतुरता लक्षात घेत पूजा इंटरेंटमेंट निर्मित गणेशाची 'सुखकर्ता दु:खहर्ता' ही आरती नव्या स्वरूपात सादर होत आहे. गणेश चतुर्थीला प्रदर्शित होत असलेल्या या आरतीमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांबरोबरच खऱ्या आयुष्यातील नायकांचादेखील समावेश आहे. संगीतकार आदित्य बर्वे ह्यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या ह्या आरतीला आदित्य ऋषी केदार ह्या गप्पाटप्पा बँडने सांगितबद्ध केले आहे. विघ्नहर्त्याचा गजर करणा-या ह्या आरतीमध्ये कोरोना काळात आपली जबाबदारी बजावत असलेले वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दल, सफाई कामगार ते अगदी पत्रकारांपर्यंत प्रत्येकांचा समावेश आहे. शिवाय, दीपाली सय्यद. किशोरी शहाणे. विजय पाटकर, चिराग पाटील, विणा जगताप यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी देखील या आरतीत सहभाग दर्शविला आहे.
 
रील आणि रियल नायकांना एकत्र आणणारी 'सुखकर्ता दुःखहर्ता' ही नवीन आरती यंदाच्या गणेशोत्सवात लोकांच्या मनात नवा उत्साह भरण्यास यशस्वी ठरेल, यात शंका नाही.