गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (09:00 IST)

नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना

नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. सुरूवातीला त्यांनी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केलं होतं. मात्र आता मुंबईतल्या वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विजय केंकरे यांची आई ललिता केंकरे यांचे नुकतेच निधन झाले होते. गेल्या सहा- सात दिवसापासून त्यांना ताप येत होता. त्यामुळे त्यांनी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं.त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
विजय केंकरे यांनी अनेक यशस्वी नाटकांच दिग्दर्शन केलं आहे. सुयोग या संस्थेद्वारे अनेक नाटकं त्यांनी केली आहेत. दिग्दर्शक म्हणून नाट्यक्षेत्रात त्यांच मोठं नाव आहे. भाई.. व्यक्ती की वल्ली आणि मुंबई-पुणे-मुंबई ३ या चित्रपटांमधून त्यांनी कामं केली आहेत.