शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (21:27 IST)

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सायंकाळी ७ वाजता त्यांना नवी दिल्लीतील गंगा राम रुग्णालयात नियमित चाचण्या आणि अधिक तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. गंगा राम रुग्णालयाचे चेअरमन डॉ. डी.एस. राणा यांनी या संदर्भातील माहिती दिली.

काही वेळापूर्वीच सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांसोबत बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच या बैठकीत कोरोना, भारत-चीन यांच्यातले तणावपूर्ण संबंध, सध्याची राजकीय स्थिती या सगळ्या विषयांवर चर्चा झाली.