बुधवार, 26 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: बुधवार, 26 नोव्हेंबर 2025 (12:49 IST)

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

relationship tips in marathi
लग्नानंतर मुलीला नवीन नाती मिळतात. जिथे ती तिच्या आई आणि वडिलांना सोडून जाते तिथे तिला तिचे सासू आणि सासरे मिळतात. याशिवाय तिच्या भाऊ आणि बहिणींऐवजी तिला नणंद आणि दीर हे नाते मिळते. पण कधीकधी नकळत आपण काही लहान चुका करतो, ज्यामुळे या नात्यात कटुता येते. विशेषतः नणंदसोबत. नणंद-वहिनी चांगल्या मैत्रीणी बनू शकतात, पण एक छोटीशी चूक या नात्याला कटुतेत बदलते. अशा परिस्थितीत, लग्नानंतर लगेच कोणत्या गोष्टी करू नयेत हे जर तुम्हाला सुरुवातीलाच माहित असेल, जेणेकरून नाते बिघडू नये, तर नाते अधिक मजबूत होऊ शकते. नणंद-वहिनी यांच्यातील नातेसंबंध अनेकदा खूप गुंतागुंतीचे आणि नाजूक असू शकतात. हे नाते कमकुवत करणारे किंवा बिघडवणारे काही मुख्य घटक (चुका) -
 
नाते कधी कमकुवत होते?
लग्नानंतर तुमच्या नणंदेला कधीही असे वाटू नये की तिच्या भावावर तुमचा एकटाच अधिकार आहे. वर्षानुवर्षांचे नाते अचानक बदलू शकत नाही. म्हणून तुमच्या पतीला तुमच्या नणंदेसोबत जास्त वेळ घालवण्यापासून किंवा तिच्याशी बोलण्यापासून कधीही रोखू नका. तिला तिच्या भावासोबत वेळ घालवण्याची, तिच्याशी चांगले वागण्याची आणि मजामस्तीमध्ये सहभागी होण्याची संधी द्या. यावरून तुम्ही तुमच्या नात्याचा किती आदर करता हे दिसून येते.
 
तसेच नणंदेला हे कळायला हवे की घरातील नवीन सदस्य म्हणून वहिनीचे आपले खाजगी आयुष्य असते. नणंदेने तिच्या आणि तिच्या भावाच्या वैयक्तिक आयुष्यात, त्यांच्या निर्णयांमध्ये किंवा त्यांच्या मुलांच्या संगोपनात अनावश्यक हस्तक्षेप केल्यास हे नाते बिघडते. प्रत्येकाच्या जागेचा आदर न करणे ही मोठी चूक ठरते.
 
तक्रार करणे
लग्नानंतर लगेचच तुमच्या नणंदेच्या आईवडिलांबद्दल किंवा भावाबद्दल तिच्याकडे तक्रार करू नका. यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. तुम्हाला काही गैरसोय होत असली तरी, तुमच्या नणंदेकडे तक्रार करू नका; ती नेहमीच तिच्या आईवडिलांची किंवा भावाची बाजू घेईल. यामुळे तुमच्या मनात कटुता निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुमच्या पतीशी बोला. थोडा वेळ घ्या. संयमाने गोष्टी सुटू शकतात.
 
तसेच नणंदेने वहिनीच्या घरातील काम करण्याच्या पद्धतीवर, तिच्या स्वयंपाकावर, तिच्या कपड्यांवर किंवा नोकरीवर सतत आणि उघडपणे टीका करणे टाळावे.
 
लगेच बदल घडेल हा विचार
नवीन सुनेने जुने नियम एकाच वेळी बदलू नका. प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे नियम आणि परंपरा असतात. म्हणून लग्नानंतर लगेचच तुम्हाला आवडेल म्हणून जुना नियम बदलण्याचा प्रयत्न करू नका.
 
तसेच नणंदेने आमच्या घरात असे चालत नाही, किंवा तुझ्या माहेरच्या पद्धती इथे आणू नकोस, असे बोलून वहिनीला दुय्यम आणि अपरिचित असल्याची जाणीव करून देणे टाळावे. सतत दुसऱ्याच्या चुका शोधणे किंवा न्यायनिवाडा करत राहणे हे नात्यात कटुता निर्माण करते.
 
तिसऱ्या व्यक्तीचे ऐकून गैरसमज वाढवणे
शेजारी, नातेवाईक किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी केलेल्या नकारात्मक आणि द्वेषपूर्ण गोष्टींवर (चुगली) सहज विश्वास ठेवू नये. गैरसमज झाल्यास एकमेकींशी थेट न बोलता मनात शंका ठेवणे किंवा इतर कुटुंबातील सदस्यांकडे तक्रारी करणे टाळावे. यामुळे मूळ समस्या सुटत नाही, उलट गैरसमज बळावतात.
 
एकमेकींना स्पर्धक म्हणून पाहणे
वहिनी आल्यामुळे नणंदेला तिचा भावावरील हक्क कमी झाल्यासारखे वाटणे. यामुळे ती नकळतपणे वहिनीला स्पर्धा म्हणून पाहू लागते आणि तिच्याशी वाद घालते. नणंदेने स्वतःला घरातील अधिक अनुभवी किंवा श्रेष्ठ मानून वहिनीवर आपले मत, नियम किंवा इच्छा लादण्याचा प्रयत्न करु नये. यामुळे वहिनीला घरात मोकळेपणा वाटणार नाही. उलट वहिनी जेव्हा नवीन घरात येते किंवा तिला काही समस्या असते, तेव्हा नणंदेने तिला भावनिक आधार द्यावा, तिच्या भावनांची कदर न करणे आणि तिच्या अडचणी समजून न घेणे योग्य ठरणार नाही.
 
या चुका टाळून परस्पर आदर, थेट आणि मोकळा संवाद आणि एकमेकांच्या मतांना महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे.