सर्वपक्षीय बैठक: सोनिया यांनी केली मोदींवर टीका, विरोधीपक्षांनी मागितलं आश्वासन
चीनसोबत सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली. यात काँग्रेसह 20 पक्षांनी सहभाग घेतला.
बैठकीच्या सुरुवातीला सर्वच नेत्यांनी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या बैठकीत काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली. सीमेवर जैसे थे परिस्थिती राहिल असं आश्वासन देशाला द्या असं त्या पंतप्रधानांना म्हणाल्या. गलवानमध्ये जे काही घडलं ते गुप्तचर यंत्रणांचं अपयश होतं का? असेही त्यांनी विचारलं. तसेच सर्वपक्षीय बैठक बोलवण्यासाठी तुम्ही काहीसा उशीरच केलात असंही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.
गलवानमध्ये जे काही घडलं ते क्लेशदायक आहे. या संवेदनशील प्रकरणांकडे तशाच पद्धतीने पाहिलं पाहिजे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चीनसोबतच्या तणावाच्यार पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलानेही जोरदार तयारी सुरू केली आहे.