शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2020 (11:16 IST)

गायकाची मोदींवर अभद्र ‍टिप्पणी, कोण आहे मेनुल एहसान नोबल ?

बांग्लादेशी गायक मेनुल एहसान नोबलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्याने मोदींविरोधात गाणं लिहून ते सोशल मीडियावर शेअर केलं. यारून त्याच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
 
मेनुलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अभ्रद टिप्पणी केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्रिपुरा पोलिसांना बांग्लादेशमधील या गायकाविरोधात एफआयआर दाखल केली आहे. सुमन पाल नावाच्या व्यक्तीने पोलिसात तक्रार नोंदवली आहे.
 
मेनुलने गेल्यावर्षी बांग्ला शो 'सा रे गा मा पा' मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत तो तिसर्‍या स्थानी होता. मेनुल त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेचं कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. मेनुल भारतीय रिअ‍ॅलिटी शोचा हिस्सा होता असला तरी तो फारशी ओळख कमवू शकला नव्हता. मात्र देश-विदेशात होणाऱ्या काही कॉन्सर्टमध्ये तो पाहायला मिळतो. मेनुलने फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच नाही तर याआधी रवींद्रनाथ टागोर यांच्यावरही आक्षेपार्ह टिपणी केली होती.
 
भारतीय दंड विधानाच्या कलम ५००, ५०४, ५०५ आणि १५३ अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही तक्रार त्रिपुरा पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडे सोपवण्यात आली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
 
सुमन पॉलने त्याच्या ट्विटर अकाउंटवर लिहिले की, 'आज मी मेनुल एहसान नोबलविरोधात तक्रार नोंदवली. मी भारतीय उच्चायुक्तांना विनंती करतो की त्याचा व्हिसा रद्द करावा. त्याच्यासोबतचे सर्व करारही रद्द करावे. जेणेकरून तो पुन्हा भारतात येऊ शकत नाही.'