मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 28 मे 2020 (10:03 IST)

मुंबई : हॉटेल फॉर्च्युनमध्ये आग, २५ डॉक्टर्सना सुरक्षित बाहेर काढले

मुंबईतील मेट्रो सिनेमा परिसरात असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये आग लागण्याची घटना घडली आहे. येथे वास्तव्याला असणाऱ्या २५ डॉक्टर्सना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे.
 
हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ फायर गाड्या आणि ४ जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाकडून बचाव कार्य अद्याप चालू आहे.