शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 23 मे 2020 (09:14 IST)

मुंबईत दारू विक्री मात्र फक्त ऑनलाईन पद्धतीने

मुंबई वगळता अन्य ठिकाणी दारूची दुकाने सुरु असतानाच मुंबईतील मद्यप्रेमींची गैरसोय होत होती. त्यामुळे अखेर महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शुक्रवारी परिपत्रक जारी करून ऑनलाईन मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, दारूची दुकानं उघडून त्यांना याची विक्री करता येणार नाही. तर ऑनलाईन पद्धतीने झालेल्या मागणीनुसार, ग्राहकांना त्यांच्या घरी सिलबंद मद्याच्या बाटल्यांची विक्री करता येवू शकते. परंतु, कोरोना रुग्ण आढळून आलेल्या बाधित क्षेत्रात अथवा सिलबंद इमारतीत या मद्यविक्रीचा पुरवठा करता येवू शकणार नाही, असे आयुक्तांनी आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.
 
याआधी महाराष्ट्र शासनाने ४ मे पासून लॉकडाऊनचा कालावधी शिथील करण्यासंदर्भात काही अटी सापेक्ष काही सेवा सुरू करायला परवानगी दिली होती. परंतु या शिथीलीकरणात लोकं अपेक्षित असलेली शिस्त पाळत नसल्यामुळे इतक्या दिवसांपासून आपण घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. तसेच अशा परिस्थितीत शासनाने पालिका आयुक्तांना दिलेल्या विशेषाधिकाराचा वापर करून, मुंबईत फक्त पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील, असा फतवा जारी करत विभागीय सहायक आयुक्तांना यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एका दिवसांत दारूची दुकाने बंद करावी लागली होती.