शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 24 मे 2020 (11:55 IST)

योगींवर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्याला मुंबईतून अटक

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतून अटक केली गेली आहे. महाराष्ट्र एटीएसद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. 
 
कामरान अमीन असं या आरोपीचं नाव असल्याचे सांगितले जात आहे. कामरानने यूपी सरकारच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर फोन करुन, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना बॉम्ब हल्ल्यात मारलं जाणार आहे अशी धमकी दिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी लखनौ येथे अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला तसेच तपासणीत ज्या मोबाईल नंबरवरुन धमकीचा फोन करण्यात आला तो मुंबईतला असल्याचं कळल्यावर महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांना याविषयी माहिती देण्यात आली.
 
धमकीचा फोन केल्यानंतर कामरानने आपला मोबाईल बंद ठेवला होता. मात्र तांत्रिक सहाय्याच्या आधारावर पोलिसांनी चुनाभट्टी परिसरातील म्हाडा कॉलनी परिसरात तपास करत कामरानला अटक केली आहे.