सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 मे 2020 (20:45 IST)

मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाशी लढण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधत आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. यासाठी मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
करोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर लॉकडाउनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन पुढे वाढवला जाणार असल्याची घोषणा केली.
 
हे पॅकेज सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी असून अर्थमंत्री यांच्याकडून आत्मनिर्भर भारत अभियानाची विस्तृत माहिती दिली जाईल असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं आहे. 
 
दरम्यान त्यांनी जगात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले असून पावणे तीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका व्हायरसने संपूर्ण जगाचं नुकसान केलं आहे. असं संकट ना कधी पाहिलं ना ऐकलं आहे. हे संकट खूप मोठं संकट असल्याचे म्हटले.