शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 जून 2020 (20:02 IST)

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केल्या या मागण्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत उद्धव ठाकरेदेखील सहभागी झाले होते. या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या कामांची माहिती देत काही मागण्याही केल्या. 
 
उद्धव ठाकरे यांनी काही औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी तसंच शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत आणि परीक्षांसाठी देशभर एकच असावं अशा तीन मुख्य मागण्या केल्यात.
 
लगेचच परीक्षा घेण्याच्या स्थितीत आम्ही नाही आहोत. अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे गुण निश्चिती करण्याचा फॉर्म्युला तयार करण्याचं ठरवलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशा रितीने मिळालेल्या गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधी देखील असेल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. 
 
तसेच त्यांनी मोठ्या गुंतवणूकदारांशी करार करून अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात करत असल्याचे सांगितले. 
 
राज्यभर सुमारे 3 लाख बेड्सची सुविधा निर्माण केली आहे तसेच फिल्ड हॉस्पिटल्स उभारले आहेत असे सांगत मीण भागासाठी व्हेंटीलेटर्सची गरज भासणार असल्याचे ते म्हणाले.