1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (13:28 IST)

टीव्ही अभिनेत्री कोरोनाच्या विळख्यात

khicdhi fame
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 लाख 3 हजार 696 इतकी झाली आहे. 24 तासांत देशात 52 हजार 972 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली. देशात आतापर्यंत 11 लाख 86 हजार 203 जण कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले असून अनेकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सर्वसामान्य जनतेपासून ते बड्या सेलिब्रिटिंनादेखील कोरोना होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, टीव्ही अभिनेत्री ऋचा भद्रालादेखील कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द ऋचाने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने कोरोना झाल्याची बातमी चाहत्यांना कळवली.
 
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ती म्हणाली, मला कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवत असल्यामुळे कोरोना चाचणी केली. माझी चाचणी पॉझिटिव्ह आली असून याबाबतीत मी बीमएसीला कळवले आहे. शिवाय तिने चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.