शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 25 जुलै 2020 (12:31 IST)

शिवराज सिंह चौहान : मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आहे

मी माझ्या सर्व सहकार्यांना आवाहन करतो की जो कोणी माझ्या संपर्कात आला आहे त्याने त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी. माझ्या जवळच्या व्यक्तींनी कॉरेंटिनमधील जावे. 
 
मी संपूर्णपणे कोरोना मार्गदर्शकाचे अनुसरणं करीत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी स्वत: कोरेन्टाईन करीन आणि उपचार घेईन. मी माझ्या राज्यातील लोकांना सावधगिरी बाळगा असे आवाहन करतो, थोडीशी निष्काळजीपणा कोरोनाला आमंत्रित करते. 
 
कोरोनाबरोबर सावधगिरी बाळगण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला पण लोक अडचणीच्या वेळेस माझ्याशी भेटतच होते. मला भेटणार्‍या सर्वांना मी त्यांची चाचणी करण्याचा सल्ला देतो. 
 
कोरोनाला घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनावर वेळेवर उपचार केल्यास कोरोना बरा होतो. 
 
मी 25 मार्च पासून दररोज संध्याकाळी कोरोनाची आढावा बैठक घेत आहे. मी शक्य तितक्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या अनुपस्थितीत ही बैठक गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, नगरविकास व प्रशासन मंत्री भूपेंद्र सिंह, आरोग्य शिक्षणमंत्री विश्वास सारंग आणि आरोग्यमंत्री डॉ. प्रभू राम चौधरी घेतील. 
 
कोरेन्टाईन असताना मी स्वत: उपचारादरम्यान राज्यात कोरोना नियंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहीन.